अक्षय कुमार एक चांगला अभिनेता आहेच याशिवाय एक उत्तम माणूसही आहे. आजवर त्याने त्याच्या माणुसकीचा प्रत्यय अनेकदा करून दिला आहे. अलीकडेच अॅक्सिडेंटमध्ये एका स्टंटमनचा मृत्यू झाला. त्यानंतर अक्षय कुमारने ५५० स्टंटमनचा अॅक्सिडेंट आणि आरोग्य विमा उतरवला आहे.
यावर स्टंट आर्टिस्ट एसोसिएशन चे जनरल सेक्रेटरी एजाज़ गुलाब अक्षयला एक भावनिक संदेश पाठवला आहे. यामध्ये अक्षयने सुरु केलेल्या मेडिक्लेम पॉलिसीबद्दल आभार मानले आहेत. या संदेशात एजाज म्हणतात की, सगळे स्टंटमन अक्षयला भेटणार आहेत. त्यांना अक्षयला मनापासून धन्यवाद द्यायचं आहे. पीपिंगमूनशी बोलताना एजाज म्हणतात, मी अक्षयच्या ‘Once Upon A Time In Mumbai’ साठी स्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. त्यावेळी त्यांनी मला विचारलं की हे किती कठीण काम आहे. तुमचा विमा वगैरे उतरवलेला आहे का, असंही त्यांनी विचारलं. त्यावर मी उत्तर दिलं की नाही. यावर अक्षयने त्यांना याविषयी काही उपाय करण्याविषयी आश्वस्त केलं. त्या शब्दानुसार अक्षयने स्टंटमन यांच्यासाठी विमा उतरवला आहे. त्यामुळे ‘अक्षयच बॉलिवूडचा खरा स्टंटमन आहे’ असं एजाज यांनी म्हटलं आहे.