Exclusive :बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह जलसामधील 5 जणांना कोरोनाची लागण

By  
on  

 बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील जलसा बंगल्यातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात आहे.  बच्चन त्यांच्या बंगल्यातील पाच व्यक्तींची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या पाच जणांमध्ये पहिलं म्हणजे स्वत: बिग बी अमिताभ बच्चन आहेत. जे स्वत: कोव्हीड-19 जागरुकतेसाठी युनियर गव्हर्नमेंटचे पोस्टर बॉय आहेत. बिग बींनी स्वत: ट्विट करून ते नानावती रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिली आहे. एवढच नाही तर मुलगा अभिषेक बच्चनलाही कोरोनाची लागण झाल्याचं त्याने स्वत: ट्विट केलं आहे. अभिषेक स्वत:ही नानावती रुग्णालयात दाखल आहे.

 

याशिवाय बिग बींनी त्या सगळ्यांना सतर्क केलय जे मागील दहा दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आले होते. बच्चन यांच्या जलसा बंगल्यातील ड्रायव्हर आणि जलसामधील आणखी दोघांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली असल्याचही बोललं जातय. मात्र बाकी परिवाराच्या कोरोनाच्या चाचणीचे रिपोर्ट आज रात्रीपर्यंत येणार असल्याचं वृत्त आहे.

 

Recommended

Loading...
Share