अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या बेडरूममध्ये मिळालेल्या लाल बॅगेमुळे निर्माण झालेल्या रहस्याचं सत्य अखेर समोर आलं आहे. बॉलिवुड एक्टर सुशांतच्या निधनाचा तपास करणाऱ्या पोलीसांनी याचा खुलासा केला आहे.ही लाल बॅग त्याच रुमच्या बाजूच्या टेबलवर दिसली होती जिथे सुशांतने 14 जूनला आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं. आणि याच बॅगमुळे सोशल मिडीयावर बरेच तर्कवितर्क लावले जात होते. कारण सुशांतचा जवळचा मित्र महेश शेट्टीच्या एका जुन्या फोटोमध्ये अशीच बॅग दिसली होती.
सुशांतचे बरेच चाहते जे त्याच्य आत्महत्यावरून बऱ्याच चुकीच्या अफवा पसरवरत आहेत आणि इतर लोकांन भडकवत आहेत. आणि अशाच काही लोकांनी सुशांतच्या आत्महत्येवरून महेश शेट्टीवरही निशाणा साधला आहे. एवढचं नाही तर सुशांतच्या आत्महत्येवरून चक्क महेशलाच प्रश्न विचारले आहेत.
महेश हा जो सुशांतच्या जवळच्या मित्रांपैकी एक होता. किंवा असही बोलता येईल तो एकमेव विश्वासू मित्र होता. सुशांतने त्याचा फोन स्विच ऑफ आणि त्याचा बेडरुम लॉक करण्याआधी 14 जून रोजी सकाळी शेवटचा कॉल महेशलाच केला होता.
तर पोलीसांना सुशांतच्या कॉल रेकॉर्डमध्ये हे सापडलं की सुशांत ने फोन केला होता पण तो कॉल कनेक्टच होऊ शकला नव्हता. आणि महेश फोन उचलू शकला नव्हता. आणि आता या लाल बॅकवरून सुशांतच्या आत्महत्येच्या रागाता चाहत्यांनी महेशला टार्गेट केलं आहे.
सुशांतच्या कित्येक फॅन्सनी सोशल मिडीयावर महेशवर आरोप केले आहे की, तो हत्या मध्ये सहभागी होता आणि महेशवर सुशांतला डबल क्रॉस आणि बॅकस्टॅब करण्याचे आरोप लावत धमक्याही दिल्या आहेत.
महेशने पोलीस तपासात पूर्ण सहकार्य केलं होतं. मात्र आता तो या आरोपांमुळे तो कोंडीत सापडलाय. तर दुसरीकडे आता पोलीसांनी सुशांतच्या बेडरुममध्ये मिळालेल्या त्या लाल बॅगेच्या खऱ्या मालकाचा शोध काढला आहे.
तर ही बॅग सुशांतची मोठी बहिण मितूची आहे. जी सुशांतच्या आत्महत्येविषयी कळताच सुशांतच्या घरी पोहोचणारी पहिली फॅमिली मेम्बर होती आणि तिनेच पोलीसांना कॉल केला होता.
असही म्हटलं जात की जशी मीतू सुशांतच्या घरी पोहोचली तेव्हा तिने तिची बॅग बाजूला ठेवली होती आणि ती सुशांतच्या जवळ गेली होती. ही लाल बॅग बऱ्याच फोटोंमध्ये पाहायला मिळतेय. आणि अशीच बॅग असणारा महेश शेट्टीचाही फोटो मिळाला होता ज्यामुळे या चर्चा होऊ लागल्या होत्या.