Exclusive: सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूप्रकरणी रिया आणि सुशांतच्या बहिणीची होणार चौकशी

By  
on  

गुणी अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येला आज एक महिना पुर्ण झाला आहे. खरं तर अनेक पुरावे तपासूनही या संदर्भात काहीच हाती न लागल्याने पोलिस पुन्हा एकदा तपास करणार आहेत. त्यामुळे मुंबई पोलिस पुन्हा एकदा रिया चक्रबोर्ती आणि सुशांतची बहीण यासोबतच त्याच्या संपुर्ण कुटुंबाची चौकशी करणार असल्याचं समजत आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिस सर्वच धागेदोरे तपासून पाहत आहेत.

 

लवकरच यातून काहीतरी ठोस निष्पन्न होईल अशी चाहत्यांना आशा आहे. यापुर्वी दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचीही चौकशी झाली आहे. सुशांत सिंह राजपूत या बॉलिवूडच्या हरहुन्नरी अभिनेत्याने 14 जून रोजी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या करणं  सर्वांच्याच जिव्हारी लागलंय. आता पुन्हा एकदा तपासातून काही निष्पन्न व्हावं अशी चाहत्यांंची आशा आहे.

Recommended

Loading...
Share