नेटफ्लिक्स हे डिजीटल प्लॅटफॉर्मच्या जगात वजनदार नाव आहे. काही दिवसांपुर्वीच नेटफ्लिक्सने भारतात 17 सिनेमे रिलीज करण्याची घोषणा केली होती. यामध्ये करण जोहरचा गुंजन सक्सेना, अनुराग बासूचा लुडो ते नवाज़ुद्दीन सिद्दीकी चा सिरियस मॅन आणि मीरा नायरचा ए सूटेबल बॉय हे सिनेमे नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहेत.
आता नेटफ्लिक्स ए लिस्ट सेलिब्रिटींशीही संपर्कात आहे. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार नेटफ्लिक्स आमीर खानसोबत मल्टीडील प्रोजेक्टसाठी बातचीत करत आहेत. नेटफ्लिक्सचे अधिकारी आमीर खान प्रॉडक्शनसोबत डील करण्यासाठी मागील वर्षापासून प्रयत्नशील आहेत. सध्या तरी ठोस असं समोर आलं नसलं तरी लवकरच काही तरी मोठं डील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमीरचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट या डीलचा हिस्सा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. के.वी. विजयेंद्र प्रसाद हे या सिनेमाचं स्क्रिप्ट लिहीत आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत हे स्क्रिप्ट लिहून पुर्ण होईल. नेटफ्लिक्सने यापुर्वीच करण जौहर आणि वायाकॉम 18 स्टूडियो सोबत एक्सक्लूसिव आउटपुट डील केली आहे.