प्रसिद्ध दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांची जोडी आता डिजीटल डेब्युसाठी सज्ज झाली आहे. हे दोघे आता एक थ्रिलर सिनेमा चाहत्यांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. पेंटहाऊस असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. सुनील खेत्रपाल यांच्या अझुरे एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली हा सिनेमा बनणार आहे. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमात तगडी स्टारकास्ट समोर आली आहे.
बॉबी देओल, अर्जुन रामपाल आणि शर्मन जोशी हे कलाकार या सिनेमात झळकणार आहेत. 2014 च्या एका हॉलिवूड ब्लॉकबस्टरचा हा ढोबळ रिमेक असल्याचं बोललं जात आहे. बॉबी शाहरुखच्या पुढील नेटफ्लिक्स मुव्हीमध्ये दिसणार आहे. पेंटहाऊसच्या निमित्ताने बॉबी आणि अब्बास-मस्तान 13 वर्षांनी पुन्हा एकत्र येत आहेत. तो यापुर्वी त्यांच्या नकाब सिनेमात दिसला होता. तर अर्जुन रामपाल बॅटल ऑफ भिमा कोरेगाव आणि शर्मन जोशी आमीरच्या लाल सिंह चढ्ढामध्ये दिसणार आहेत.