By  
on  

Exclusive: सोनी पिक्चर्स ‘द गंगा हायजॅक ड्रामा’ वर बनवणार सिनेमा

30 जानेवारी 1971 मध्ये भारतात ‘गंगा हायजॅक’ प्रकरण घडलं होतं. दोन काश्मिरी तरुणांनी गंगा नावाचं विमान हायजॅक केलं होतं. हे विमान थेट लाहोर एअरपोर्टवर उतरवलं गेलं. हाशिम कुरैशी आणि अशरफ कुरैशी या तरुणांनी हे हायजॅक केलं आहे. ही बातमी भारत सरकार समजल्यानंतर या विमानातील यात्रींना सोडण्यासाठी या दोघांशी वाटाघाटी केल्या जातात.

वाटाघाटीनंतर विमानातील सर्व प्रवासी अटारी बॉर्डरवर सोडले जातात. काही दिवसांच्या चौकशीनंतर समोर येतं की या हायजॅकमधील हत्यारं खोटी असून हे फेक हायजॅक होतं. यानंतर भारत पाकिस्तानचा हा काळा कारनामा सगळ्यांसमोर आणतो. यासोबतच पाकिस्तानला आपल्या हवाई हद्दीमध्ये प्रवास करू देण्यासही मनाई करतो. कुरेशी बंधूंना पाकिस्तानमध्ये केवळ 7 वर्षांची शिक्षा ठोठावली जाते. 

आता बॉलिवूडमध्ये या घटनेवर सिनेमा बनणार आहे. पीपिंगमूनला एक्सक्लुसिव्हली समजलं आहे की सोनी पिक्चर्स ‘द गंगा हायजॅक ड्रामा’वर सिनेमा बनवणार आहे. सध्या या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे. यावेळी टीमकडून असं सांगण्यात आलं की एक तगडी स्क्रिप्ट बनवायचा विचार सुरु आहे. पुढील वर्षाखेरीस हा सिनेमा फ्लोअरवर जाईल अशी शक्यता आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive