By  
on  

Exclusive: सध्या आमीर खानच्या ‘मोगुल’ साठी नाही तर सोनी लिव्हच्या सिरीजचं दिग्दर्शन करत आहेत सुभाष कपूर

दिग्दर्शक सुभाष कपूर सध्या आमीर खानचा मोगुल सिनेमा थोडा बाजूला ठेवत आहेत. त्याऐवजी ते एका पॉलिटिकल सिरीजचं दिग्दर्शन करणार असल्याचं पीपिंगमूनला समजलं आहे. सध्याते ऋचा चढ्ढा स्टारर ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ च्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहेत. त्यानंतर ते नव्या प्रोजेक्टना हात लावतील. 

 

सध्या ते मोगुल ऐवजी एका पॉलिटिकल ड्रामा सिरीजला हात लावणार आहेत. अलीकडेच त्याचा प्रिमिअर पार पडला. आता या सिरीजचं प्री प्रॉडक्शन काम सुरु आहे. ही सिरीज ऑक्टोबरपर्यंत फ्लोअरवर जाण्याची शक्यता आहे.  त्यानंतरच ते गुलशन कुमारचा बायोपिक मोगुलला सुरुवात करतील. याच्या पटकथेचं काम पुर्ण झालं असून जानेवारीमध्ये आमीरशी या संदर्भात बोलणं केलं जाणार आहे. आमीर सध्या विक्रम वेधाच्या रिमेकची तयारी करताना दिसत आहे. याशिवाय सुभाष कपूर जॉली एलएलबीच्या तिस-या भागावर काम करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive