गेले चार महिने घरी घालवल्यानंतर जॉन पुन्हा एकदा शुटिंगसाठी सज्ज झाला आहे. जॉन ऑगस्टच्या मध्यावर संजय गुप्ताच्या ‘मुंबई सागा’ चं उर्वरित शुटिंग करेल. यासोबतच सप्टेंबरमध्ये लखनऊ येथे सत्यमेव जयतेच्या सीक्वेलला सुरुवात करेल.
पीपिंगमूनला मिळलेल्या माहितीनुसार या दरम्यान जॉन आणखी एका सिनेमाचं शुट करत आहे. जॉन अर्जुन कपुर आणि रकुलप्रीत यांच्या आगामी सिनेमात कमियो करताना दिसेल. तो या सिनेमाचा सहनिर्माताही आहे.
या कॉमेडी ड्रामामध्ये जॉन अर्जुनच्या आजोबांची आणि नीना गुप्ता यांच्या पतीच्या भूमिकेत दिसेल. हे शूट 5-6 दिवस चालेल असं बोललं जात आहे. अनुजा चौहान, अमितोष नागपाल आणि काश्वी नायर यांनी लिहिलेल्या या सिनेमात कुमुद मिश्रा पाकिस्तानी मेयरच्या भूमिकेत दिसतील. आजी आणि नातवामधील हृदयस्पर्शीबंधाची ही गोष्ट आहे. नीना यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे.
निखिल आडवाणी, भूषण कुमार आणि जॉन अब्राहम या सिनेमाची निर्मिती करत आहेत. या सिनेमाच्या फॉरेनमधील शुटिंगबाबत अजून कोणताच निर्णय घेण्यात आला नाही.