Exclusive: आर्यन खान ‘तख्तसाठी’ नाही करणार करण जोहरला असिस्ट

By  
on  

सध्या स्टारकिडसच्या डेब्युचा माहोल आहे. सध्या चर्चा आहे ती आर्यन खानच्या डेब्युची. आर्यन खानच्या डेब्युबद्दल बॉलिवूडमध्ये अंदाज बांधले जात आहेत. २१ वर्षीय आर्यन खानने शाहरुख प्रमाणेच रसिकांवर अभिनयाची जादू करावी अशी शाहरुखच्या चाहत्यांची इच्छा आहे. पण आर्यन करण जोहरला ‘तख्त’साठी दिग्दर्शनात असिस्ट करणार असल्याची बातमी ट्रेंडमध्ये होती. पण शाहरुखने मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार आर्यन तख्त मधून डेब्यु करणार नाही.

आर्यनच्या डेब्युवर शाहरुख म्हणतो, ‘आर्यनला पडद्यामागे राहून काम करायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही, त्यापुर्वी त्याने पाच-सहा वर्ष हे सगळं शिकावं. त्यानंतर तो करणचा असिस्टंट बनू शकतो. त्यामुळे आर्यन इतक्यातच डेब्यु करणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

 

Recommended

Loading...
Share