Exclusive: सुशांतवर काळ्या जादूचा प्रयोग झाला होता, सुशांतची बहीण मीतूने पटना पोलिसांना दिला जबाब

By  
on  

सुशांत सिंग राजपुतची बहीण मीतूने पटना पोलिसांना दिलेल्या जबाबात सुशांतवर काळ्या जादूचा प्रयोग झाल्याचा जबाब दिला आहे. पीपिंगमूनला असं समजलं आहे की, सुशांतवर रिया आणि तिची आई संध्या यांनी मांत्रिकाकडून काळी जादू करवून घेतल्याचा आरोप मीतूने केला आहे. 

 

हा तांत्रिक नेहमी सुशांतच्या अपार्टमेंटमध्ये ये जा करत असे. त्याला चक्रवर्तींकडून सुशांतच्या डिप्रेशनचा इलाज करण्यासाठी बोलावलं जात असे. मीतूने पटना पोलिसांना दिलेल्या जबाबात ही बाब उघड केली आहे. या तांत्रिक घरी आल्यावर सुशांतला एक तावीज देत असे. सुशांतच्या घरी काम करत असलेल्यांनी ही माहिती दिली होती. 
तांत्रिकने केलेल्या या अनुष्ठानावेळी सर्व नोकरांना जाण्यास सांगितलं जात असे. संध्या यावेळी तासनतास चालत असलेल्या अनुष्ठानांवर लक्ष ठेवून असे. पटना पोलिस या तांत्रिकाचा जबाबही घेणार असल्याचं समोर येत आहे.

Recommended

Loading...
Share