By  
on  

Exclusive:करीना कपूर करेल का ‘भारत’चा स्विकार, होणार का सलमानची पत्नी?

प्रियंका चोप्राने ‘भारत’ सिनेमा सोडल्यानंतर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. प्रियंका आता करत नसलेली भूमिका कोण्याच्या वाट्याला येणार याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. प्रियंकानंतर सलमानसोबत झळकण्याचा मान कतरिना कैफला मिळणार असल्याचे बोलले गेले, परंतु या भूमिकेसाठी कतरिनाचा विचार करण्यात येत नसल्याची माहिती आहे.

पिपींगमूनला सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, प्रियंकाने ‘भारत’ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर या सिनेमात बेबोला म्हणजेच करिना कपूरच्या नावाचा विचार केला जात आहे. निर्मात्यांचं असं म्हणणं आहे, “प्रेक्षक सलमान कतरिना आणि सलमान-जॅकलिन यांना ऑन स्क्रिन पाहून कंटाळले आहेत आणि आता सलमानसोबत त्यांना दुस-या अभिनेत्रीला पाहायला आवडेल.”

यापूर्वी करिना कपूर आणि सलमान खान यांनी काही निवडक सिनेमांमध्येच एकत्र काम केले आहे. ‘दबंग 2’ हा या दोघांचा शेवटचा सिनेमा होता. यात करिनाचा आयटम परफॉर्मन्स होता. याआधी ते दोघे ‘बॉडीगार्ड’ आणि ‘क्यू कीं’ या सिनेमांमध्ये एकत्र झळकले होते.

परंतु बेबो आपल्या व्यस्त शेड्यूलमधून ‘भारत’ स्विकारेल का, हा मोठा प्रश्न आहे.त्यामुळे सर्वांच्याच नजरा आता या भूमिकेसाठीच्या अधिकृत घोषणेकडे खिळल्या ाहेत

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive