रणवीर सिंह यशराज फिल्मसच्या सिनेमात अद्यापतरी सुपरहिरो साकारणार नाही

By  
on  

बॉलिवूडच्या एनर्जी मॅन रणवीर सिंह कधी काय करेल याचा नेम नाही. त्याच्या अलिकडेच आलेल्या गली बॉय सिनेमात सुपर रॅपरची भूमिका साकारत त्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता सर्वांना त्याच्या आगामी सिनेमाचे वेध लागले आहेत. पुढील सिनेमात तो नेमकी कशी भूमिका साकारणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

काही दिवसांपासून प्रसिध्दी माध्यमांमध्ये एक बातमी फिरतेय. ती म्हणजे रणवीर सिंह लवकरच एका सुपरहिरो भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे आणि हा सिनेमा यशराज फिल्मस बॅनर अंंतर्गत तयार होत आहे. तसंच हा एक सायन्स फिक्शन अॅडव्हेंचर सिनेमा असून रणवीरने तो साईन केल्याचेही बोलले जात होते.  परंतु रणवीरच्या टॅलेंट मॅनेजमेन्ट टीमने त्याने सध्यातरी असा कोणताच सिनेमा साईन केला नसल्याने हे वृत्त फेटाळून लावले आहे.

https://www.instagram.com/p/Bv4Jf4shykO/

सध्या रणवीर सिंहचं संपूर्ण लक्ष स्पोर्ट्स बयोपिक 1983 वर आहे, तर त्यानंतर तो करण जोहरच्या तख्तच्या शूटींगला सुरुवात करणार आहे. त्यामुळे त्याची सुपरहिरो भूमिका नेमकी कधी पाहायला मिळणार यासाठी आता आणखी जास्त वाट पाहावी लागेल.

Recommended

Loading...
Share