Exclusive: ईडीच्या तपासणीत रिया चक्रवर्ती सहकार्य करत नाहीय, सुशांत सिंह राजपूतच्या जीजाजीवर लावला कट रचण्याचा आरोप

By  
on  

रिया चक्रवर्ती ही ईडीच्या तपासणीत सहकार्य करत नसल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार कळतय. ती सारखं स्वत: आजारी असल्याचं आणि काहीच आठवत नसल्याचं सांगत आहे. रियाच्या म्हणण्यानुसार पैशाची बाब ही मनाने रचलेली आहे. सुशांतच्या परिवारातील काही लोक सुशांतचं इन्सुरन्स आणि संपत्ती मिळवण्यासाठी दबाव आणत असल्याचं ती सांगते. त्या लोकांनी सुशांतला रियापासून वेगळं होण्यासाठीदेखील दबाव आणला होता मात्र सुशांत समजूतदार होता म्हणूनच त्याने त्याच्या परिवारापासून दुरावा निर्माण केला असल्याचं ती सांगते.
शिवाय सुशांतचे जीजा हे काही महिन्यांपासून मोठा कट रचत आहेत. सुशांतने जे काही पैसे खर्च केले ते त्याच्यानुसार केले. सुशांतच्या म्हणण्यावरच ती घर आणि बाकी कामं पाहत होती. सुशांतची इच्छा होती की तो त्याचं काम पाहिल आणि रिया त्याच्या बाकी गोष्टींची जबाबदारी घेईल. ती म्हणते की, मी पण पैसे कमावले आहेत. मी सात सिनेमे केले आहे. मी एका चांगल्या परिवारातून आलेली आहे. आणि माझ्या वडिलांनीदेखील मोठी सेविंग माझ्या नावावर केली आहे. 

 सुशांत सिंह राजपूत आत्महत्या केसमध्ये सीबीआयने आजा एफआयआर दाखल केली आहे. बिहार सरकारद्वारे केलेल्या मागणीनुसार आणि भारत सरकारकडून पुढील नोटिफिकेशन मिळाल्यानंतर सीबीआयने केस ताब्यात घेतली आहे. याआधी बिहारच्या पटनामधील राजीव नगर पोलीस स्टेशनमध्ये सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या परिवाराविरोधात एफआयआर दाखल केली होती. या केसमध्ये 6 लोकांची नावं असल्याचं बोललं जातय. 

Recommended

Loading...
Share