Exclusive: अंकिता लोखंडेसोबतच्या फ्लॅटचे ईएमआय सुशांतच्या अघोषित खात्यातून? ईडी तपासात आलं समोर

By  
on  

सुशांत सिंग राजपुत आत्महत्या प्रकरणाची लढाई भलेही सुशांतचं कुटुंब, रिया चक्रवर्ती, महाराष्ट्र पोलिस आणि बिहार पोलिस यांच्यामध्ये सुरु आहे. याचदरम्यान ईडी अभिनेत्याच्या पैशाच्या आणि मनी लॅण्ड्रिंगबाबतही चौकशी करत आहे. यामध्ये पीपिंगमूनला एक्सक्लुसिव्हली समजलं आहे की, सुशांतच्या कथित मालाडमधील वेस्ट लिंक रोडवर बनलेल्या ब्लॉक इंटरफ़ेस हाइट्समधील फ्लॅट नंबर 403 और 404 चे ईएमआय देत होते. 

पीपिंगमूनला लॉबीमध्ये लागलेल्या फ्लॅट मालकांच्या नावाचा फोटो मिळाला आहे. यामध्ये 403 नंबरचा फ्लॅट सुशांतच्या नावे होता तर 404 अंकिता लोखंडेच्या नावे होता. या फ्लॅट्सचे ईएमआय स्टैंडर्ड चार्टर्ड बॅंकेमधून केले जात होते. मृत्यूच्या काही दिवस आधीपर्यंत सुशांत या फ्लॅटचं पेमेंट करत होता. मेंटेनन्सही दिला जात होता. रियाला या फ्लॅटबाबत काहीच माहीती नव्हतं. त्या अकाउंटवर अजूनही 30 लाख रुपये आहेत. अंकिताकडून याबाबत माहिती मिळू शकली नाही. पिपींगमूनने संपर्क साधायचा प्रयत्न केला असता कोणतंही उत्तर मिळू शकलेलं नाही. येत्या काही दिवसात याबाबत अंकिताकडूनही माहिती घेतली जाईल.

Recommended

Loading...
Share