By  
on  

'हिरा मंडी' वेबसिरीजद्वारे संजय लीला भन्साळी यांचं डिजिटल क्षेत्रात पदार्पण?

बॉलीवूडच्या दर्जेदार सिनेमांचे निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाली हे वेबसिरीज च्या विश्वात पाऊल टाकण्यासाठी सज्ज आहेत.

पिपिन्गमूनच्या सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार भंसाली प्रोडक्शनच्या सीईओ प्रेरणा सिंह या काही डिजिटल प्लॅटफॉर्मशी बोलत असल्याची माहिती मिळत आहे.

सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार भंसाली प्रोडक्शनची वेबसिरीज प्रख्यात स्त्री गैंगस्टर गंगूबाई कोठेवालीच्या आयुष्यावर बेतलेली आहे. प्राथमिक दृष्ट्या या वेबसिरीजच शीर्षक 'हिरा मंडी' असं असणार आहे. सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार या विषयवार आधी सिनेमा येणार आहोत. परंतु विषय लक्षात घेता या विषयावर वेबसिरीज बनवण्याचा निर्णय दिग्दर्शकांनी घेतला आहे.

सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसारअभिनेत्री प्रियांका चोप्राचं नाव या वेबसीरिजसाठी चर्चेत आहे. परंतु याबाबत निश्चित माहिती कळाली नाही. सध्या या वेबसिरीजच्या लिखाणाचं काम अंतिम टप्प्यावर आलं आहे. गंगुबाईंनी देहविक्री करणाऱ्या महिलांच्या अन्यायाविरोधात जो आवाज उठवला होता, त्यावर ही वेबसीरीज आधारित आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive