बॉलिवूडचा हॅण्डसम हंक अभिनेता वरुण धवनच्या आगामी प्रोजेक्टबद्दल नुकतीतच एक बातमी हाती लागतेय. श्रीराम राघवन दिग्दर्शित अरुण खेतपाल यांच्या जीवनावर आधारित सिनेमाचं शूटींग वरुण मे महिन्यात पूर्ण करणार होता, परंतु लॉकडाऊनमुळे हे शक्य होऊ शकलं नाही. हा सिनेमा एक्शनपट असल्याने मोठ्या प्रमाणावर एक्शन सीन्स शूट करायचे होते, परंतु ते होऊ शकलं नाही.
याशिवाय वरुणकडे आणखी एक सिनेमा आहे. गुड न्यूजच्या दिग्दर्शकासोबत म्हणजेच राज मेहतासह वरुणने सिनेमा साईन केला आहे. यात कियारा अडवाणी त्याची नायिका आहे. तर अनिल कपूर आणि नीतू कपूर त्याच्या आई-वडीलांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. यासोबतच पिपींगमून डॉट कॉमला मिळालेल्या एक्स्कल्युझिव्ह माहितीनुसार वरुण धवनने आणखी एक प्रोजेक्ट साईन केलं आहे.
'स्त्री' डायरेक्टर अमर कौशिक यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये वरुण धवन झळकणार असल्याची पिपींगमून डॉट कॉमला सूत्रांनी माहिती दिली आहे. दिनेश विजान यांची मडॉक फिल्म्सचं या सिनेमाची निर्मिती करणार आहे. हा हॉरर कॉमेडी सिनेमा असणार आहे. सध्या तरी या सिनेमाचं नाव 'भेडीया' असं ठेवण्यात आलं आहे.