Exclusive: दीपिकाच्या फोनवरून जया साहाकडून कुणी दुस-यानेच केली ड्रग्जची मागणी?

By  
on  

मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या ड्रग्ज कनेक्शनबाबत अनेक आश्चर्यजनक खुलासे समोर येत आहेत. पीपिंगमूनला एक्सक्लुसिव्हरित्या समजलं आहे की, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) समोर दीपिका आणि तिची मॅनेजर जया यांच्यामध्ये एक-दोन नाही तर अनेक चॅट आहेत. तर तपास यंत्रणांनी केवळ दोनच चॅट सार्वजनिक केले आहेत. 

 

सुत्रांनुसार, NCB दीपिका आणि जयाच्या चॅट पद्धतीबाबत उत्सुक आहेत.  त्यांना असा संशय आहे की दीपिकाच्या फोनचा वापर करून कुणी दुस-यानेच ड्रग्जबाबतचं संभाषण केलं आहे. NCBच्या सुत्रांनुसार ‘Cuss’ शब्द आणि स्लॅंगमुळे या प्रकरणात तिस-या व्यक्तीचा सहभागही असल्याची शक्यता असू शकते.

Recommended

Loading...
Share