मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय दिग्दर्शक-लेखक स्वप्निल मयेकर यांचं निधन झालं आहे. स्वप्नील यांनी अवघ्या 46 व्या वर्षी जगाचा घेतला आहे. स्वप्नील मयेकर आगामी 'मराठी पाऊल पडते पुढे' या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करत होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे चित्रपट एक दिवसांनंतर म्हणजे 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चेंबूर येथील त्यांच्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
स्वप्नील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.यापूर्वी स्वप्नील मयेकर यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्याशिवाय त्यांनी एका भोजपुरी चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते.