Video : चौक'ची रोमॅंटिक छटा, 'तुझ्या डोळ्यांच्या डोहात' गाणं रिलीज

By  
on  

'चौक' चित्रपटाची चर्चा त्याच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यामुळे चांगलीच रंगलेली असताना, आता या चित्रपटातील नव्या रोमॅंटिक गाण्याने एन्ट्री घेतली आहे. 'तुझ्या डोळ्यांच्या डोहात, काळ्या तिळाच्या मी मोहात' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात किरण गायकवाड आणि संस्कृती बालगुडे ही जोडी झळकली आहे.

'चौक'चा ट्रेलर लॉन्च सोहळा सोशल मीडियात गाजत असतानाच आता या गाण्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या गाण्यात किरण-संस्कृती ही जोडी गोड रोमान्स करताना दिसते. सगळ्या प्रकारच्या भावना या गाण्यात मिसळून आलेल्या आहेत. प्रेम,आनंद, भावनिकता, एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकण्याची तयारी, जगापासून आपलं प्रेम लपविण्याचा छोटासा प्रयत्न आणि जगाची पर्वा न करता एकमेकांसाठी, एकमेकांसोबत जगण्याची आशा! अशा सगळ्या भावरसांनी उमलेलं हे गाणं आहे. प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने-माडे आणि ओंकारस्वरूप यांनी आपल्या स्वरांनी गाण्याला 'चार‌ चॉंद' लावले आहेत. तर, सुहास मुंडे यांच्या लेखणीतून साकारलेलं हे गाणं असून, ओंकारस्वरूप यांनीच गाण्याला संगीतबद्ध केलं आहे.

‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली असून, प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत. तर, चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे. या यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. चौक १९ मे रोजी राज्यातील प्रत्येक चौकातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

 

Recommended

Loading...
Share