शाहरुखचा Netflix शो 'बेताल'वर मराठी लेखकांनी लावला कॉपीराईट उल्लंघनाचा आरोप

By  
on  

बॉलिवूड किंग खान शाहरुख सध्या आपल्या निर्मिती संस्थेअंतर्गत अनेक नानाविविध प्रोजेक्टसद्वारे रसिकांच्या भेटीला येतो. नुकत्याच त्याच्या रेड चिली अंतर्गत तयार झालेली वेबसिरीज 'बेताल'ची बरीज चर्चा रंगली आहे. सर्वांनाच त्याच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली असतानाच आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 'बेताल'वर नुकताच  मराठी लेखकांनी त्यांच्या सिनेमातील १० मुद्दे चोरी केल्याचा आरोप लावला आहे. 

समीर वाडेकर आणि महेश गोसावी या मराठी लेखकांनी 'बेताल'वर कॉपीराईटचं उल्लंघन केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या वेताल या सिनेमातले १० मुद्दे शाहरुखच्या रेड चिली एन्टरटेन्मेन्ट अंतर्गत तयार करण्यात आलेल्या 'बेताल'मध्ये अगदी जसेच्या तसे घेण्यात आले आहेत. 

एका वेबसाईटशी बोलताना लेखक समीर वाडेकर म्हणाले, आम्ही आमची स्क्रिप्ट अनेक प्रोडक्शन हाऊसला घेऊन गेलो होतो, पण शाहरुखच्या रेड चिली एन्टरटेन्मेन्टला ती कधीच दिली नव्हती. स्क्रीन राइटर्स एसोसिएशनसोबत माझी स्क्रिप्ट रजिस्टर झाल्यानंतर जवळपास एक वर्षाने जुलै २०१९ मध्ये  'बेताल' शो ऑन फ्लोअर गेला.  SWA मध्येसुदध्दा आम्ही याची तक्रार दाखल केली आहे. 

तसंच समीर वाडेकर यांनी आपल्या मराठी सिनेमाची कथा संपूर्णपणे याच वेबसिरीजच्या प्लॉटवर आधारित असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांनी थेट आता कोर्टाकडे न्याय मागितला आहे. 

 

Recommended

Loading...
Share