निवेदिता सराफ यांना कोरोना झाल्यामुळे 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत केला हा बदल

By  
on  

'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती बनली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रसिसाद मिळतच आहे. शिवाय मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांना आवडलय. मात्र याच मालिकेतील सासूबाई म्हणजेच आसावरीच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. निवेदिता यांनी याविषयीची माहिती काही दिवसांपूर्वीच त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर व्हिडीओच्या माध्यमातून दिली होती. 

निवेदिता यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानं आता मालिकेच्या भागांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आल्याचं वृत्त आहे. या मालिकेचा आता सप्ताह विशेष भाग दाखवण्यात येणार आहे. ज्यात मालिकेच्या सेटवरील काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सेटवरील कलाकार, तंत्रज्ञ चित्रीकरणादरम्यान कशी एकमेकांची काळजी घेतात या गोष्टी या सप्ताह विशेष भागात पाहायला मिळणार आहे.

28 सप्टेंबर तर 4 ऑक्टोबर पर्यंत हे सप्ताह विशेष भाग पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर निवेदिता सराफ या कोरोनातून बऱ्या होऊन जेव्हा चित्रीकरणास सुरुवात करतील तेव्हा आसावरीची या मालिकेत पुन्हा एन्ट्री पाहायला मिळेल.

सध्या निवेदिता सराफ यांनी घरातच स्वत:ला क्वारंटाईन केलेलं आहे. त्यांना कोरोनाची कोणतीच लक्षणे जाणवली नव्हती मात्र चाचणी केल्यानंतर त्यांची कोव्हिड चाचणी पॉझिटीव्ह आली.

Recommended

Loading...
Share