By  
on  

ॲनिव्हर्सरीच्या सोहळ्यात सोहमच्या हातून मंगळसूत्र घालणार शुभ्रा ?

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत आता हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. मालिकेला सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. आता आली आहे सोहम आणि शुभ्राची पहिली ॲनिव्हर्सरी. त्यातच दोघांचं कुटुंब आता या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करण्याचं ठरवत आहेत. याने शुभ्रा आणि सोहममधील वाद मिटावे ही त्यांची इच्छा आहे. तर दुसरीकडे आसावरी शुभ्राला मंगळसूत्र न घालण्यावरून पुन्हा टोकते. मात्र आसावरीसाठी शुभ्रा ॲनिव्हर्सरीच्या सोहल्यात सोहमच्या हातून मंगळसूत्र घालण्याचा निर्णय घेते. 

या सोहळ्यात  घरी आलेल्या पाहुण्यांना घराबाहेर जायला सांगतो आणि शुभ्रावर मंगळसूत्र घालण्याची जबरदस्ती करतो. मात्र या मंगळसुत्रामागचं नेमकं रहस्य काय ? याविषयी जेव्हा आसावरीला कळेल तेव्हा काय होईल ? हे मालिकेच्या पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तेव्हा हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहणं रंजक ठरणार आहे.


 
या मालिकेला आत्तापर्यंत प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या मालिकेसह मालिकेतील शुभ्रा, आसावरी, बबड्या, अभिजीत ही पात्रही लोकप्रिय ठरली आहेत. सोशल मिडीयावर तर या भूमिकांचे मिम्सही पाहायला मिळतात. 

Recommended

PeepingMoon Exclusive