By  
on  

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेच्या ब्रेकटाईममध्ये मेकअपरूमध्ये अभिनेत्री अशा करतात डान्स

'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका कमी कालावधीच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेची हटके कहाणी प्रेक्षकांचं लक्ष वेधतेय. अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता हर्षद अतकरी या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. 

 

अभिनेत्री समृद्धी या मालिकेत किर्तीच्या भूमिकेत आहे. मात्र खऱ्या आयुष्यात समृद्धी एक उत्तम नृत्यांगना आहे. म्हणूनच या मालिकेच्या चित्रीकरणाच्या ब्रेकटाईममध्ये समृद्धी मेकअपरुममध्ये तिच्या नृत्याची आवड जोपासते. एवढच नाही तर ती एकटीच नाही तर इतर कलाकारही तिच्या सोबतीला डान्स-मस्ती करतात. सोशल मिडीयावर या कलाकारांचे डान्स व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत.

 

या मालिकेतील शुभम - किर्तीचं आता लग्न झालेलं आहे. त्यानंतर मालिकेत विविध गोष्टी पाहायला मिळणार आहे. एका आठवी पास मुलासोबत लग्न केल्यानंतर पदवीधर शिक्षण घेतलेल्या आणि पुढे शिकण्याची इच्छा असलेल्या किर्तीला काय काय अडथळे येतात हे या मालिकेत सध्या पाहायला मिळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive