By  
on  

सुखाची चाहूल घेऊन आली कोजागिरी, 'सुखी माणसाचा सदरा' मालिकेत कोजागिरी स्पेशल भाग

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. टेलिव्हिजनवरही आता कोजागिरी पौर्णिमा साजरी होताना दिसणार आहे. मालिकांमध्ये प्रत्येक सण, उत्सव साजरे होताना दिसतात. तेव्हा कोजागिरी पौर्णिमाही साजरी होताना दिसणार आहे. 'सुखी माणसाचा सदरा' या नुकत्याच भेटीला आलेल्या मालिकेत कोजागिरी स्पेशल एपिसोड दाखवण्यात येतोय. या खास भागात कोजागिरीचं महत्त्वही सांगितलं जातय.

तेव्हा सुखाची चाहूल घेऊन कोजागिरी आली आहे. आणि 'सुखी माणसाचा सदरा' मालिकेच्या आपल्या माणसांसोबत ही साजरी होणार आहे.

 

'सुखी माणसाचा सदरा' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या मालिकेत अभिनेता भरत जाधव आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी मुख्य भूमिकेत आहेत. आपल्या माणसांची, कुटुंबाची आपली कथा या मालिकेत दाखवली जात आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive