'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेती पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. एकीकडे शनाया आणि राधिका एकत्र मिळून गुरुनाथला धडा शिकवताना दिसल्या. तर आता दुसरीकडे पुन्हा शनाया आणि राधिका यांच्यात मतभेद सुरु झाल्याचे दिसत आहे. या मतभेदाचं कारण दुसरं तिसरं कुणी नसून गुरुनाथच आहे.
राधिकाच्या राधिका मसालेची वाट लावण्यासाठी आता शनाया आणि गुरुनाथ एकत्र झाल्याचं पाहायला मिळतय. जावयाच्या कॅरेक्टरसाठी शनाया गुरुनाथचं नाव सुचवते. हे ऐकून राधिका मात्र चिडते. मात्र आता स्वत: शनायाचा राधिकाची वाट लावण्यासाठी गुरुनाथसोबत हातमिळवणी करत असल्याचं पाहायला मिळतय.
आता शनाया राधिका मसालेची वाट लावण्यात यशस्वी ठरेत का ? की गुरुनाथ साठी राधिका आणि शनायाने मिळून हा नवा डाव आखलाय हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेलच. मात्र या दोघींनेमध्ये झालेले हे मतभेद मालिकेत कोणतं नवं वळण घेऊन येतं हे पाहणं रंजक ठरेल.