By  
on  

पाहा Video : सिद्धीच्या जीवावर असं बेतणार आत्याबाईंच्या वारसाचं रहस्य ?

'जीव झाला येडापिसा' या मालिकेने आता वेगळं वळण घेतलेलं पाहायला मिळतय. सुरुवातीपासूनच ही मालिका लोकप्रिय ठरली. या मालिकेतील शिवा आणि सिद्धीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. मात्र आता मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय.

एकीकडे आत्याबाईंच्या वारसाचं रहस्य त्यांना कळालय. मात्र हे रहस्य कळल्यानंतर ही गोष्ट सिद्धीच्या जीवावर बेतणार की काय असं चित्र आता निर्माण झालय. तर दुसरीकडे सिद्धीवर जीवापाड प्रेम करणारा शिवा तिच्यासमोर आलेल्या संकटातून तिला वाचवण्यासाठी पुढे सरसावला आहे.

 

या सगळ्यात आत्याबाईंच्या वारसाचं रहस्य सिद्धीच्या जीवावर बेतणार का ? आणि शिवा सिद्धीला वाचवू शकणार का ? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये आत्याबाई बंदूकीने गोळी झाडताना दिसत आहेत. तर शिवा धावत येऊन सिद्धीला वाचवण्यासाठी पुढे येताना दिसतोय. मात्र आता नेमकं काय पाहायला मिळेल हे मालिकेच्या आगामी भागातच समोर येईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive