'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत गुरुनाथला अद्दल घडवण्यासाठी, त्याला बदलण्यासाठी राधिकाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहे. मात्र गुरु बदलण्याचं नाव काही घेत नाही. त्याच्यात काहीच बदल होताना दिसत नाही. गुरु आहे तसाच वागत राहतोय. यातच तो शनायानंतर आता मायाला फसवतोय. मात्र राधिका पुन्हा एक नवा प्लॅन करताना दिसतेय.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मालिकेच्या प्रोमोमध्ये एका एग्रिमेंटचा चेक गुरु स्विकारताना दिसतोय. त्यानंतर हा दिवस कायम लक्षात राहील असं राधिका म्हणते. त्यातच मायाच्या हाती हा चेक लागतो. तेव्हा गुरुचं सत्य मायासमोर आल्यावर नेमकं काय घडेल हे मालिकेच्या पुढील भागात समोर येईलच.
तेव्हा अशाप्रकारे राधिका गुरुला अद्दल घडवण्यात यशस्वी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र इतकी वर्षे तसाच वागणाऱ्या गुरुला अद्दल कधी घडेल याचीच वाट पाहायची आहे.