By  
on  

पाहा Photos : सुबोध भावेच्या या मालिकेने पूर्ण केले 50 भाग

'चंद्र आहे साक्षीला' ही मालिका सुरुवातीपासूनच अनेक ट्विस्ट घेऊन आली. अभिनेता सुबोध भावे, ऋतुजा बागवे, नक्षत्रा मेढेकर या कलाकारांनी या मालिकेतील गुढ अधिक रंजक बनवला. नुकतच या मालिकेने 50 भाग पूर्ण केले आहेत.

या मालिकेचे 50 भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केक कापून सेटवर सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी मालिकेच्या संपूर्ण टीमने केक कापून सेलिब्रेट केलं. अभिनेता सुबोध भावेने सोशल मिडीयावर याच निमित्ताने काही फोटो शेयर केले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

सुबोध या पोस्टमध्ये लिहीतो की, "चंद्र आहे साक्षीला आज ५० भाग, पुन्हा एक वेगळी भूमिका. धन्यवादआणि उत्तम अभिनेत्यांबरोबर काम करण्याची संधी"

या मालिकेतून सुबोध भावेची एक वेगळी भूमिका पाहायला मिळतेय. या मालिकेतील श्रीधर ही भूमिका सुबोध साकारतोय. जो स्वातीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी लग्न करतो. प्रत्येक वळणावर ही मालिका वेगळे ट्विस्ट घेऊन येत आहे. आता 50 भाग पूर्ण झाल्यानंतर ही मालिका पुढील भागात काय घेऊन येतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive