By  
on  

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेचा महारविवार एपिसोड, अभिमन्यू-लतिकाच्या नात्याची नवी सुरुवात ?

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील वेगळं कथानक सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधतय. आता मालिकेत अभिमन्यू आणि लतिकाचं वेगळं नात पाहायला मिळतय. दोघांमध्ये कितीही मतभेत असले तरीही संकटात दोघं एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आणि आता अभिमन्यूच्या मनात लतिकाबद्दल आदर आणि आपुलकी निर्माण झाली आहे. 

 आता अभिमन्यूला लतिकाचा खंबीर आधार मिळाला आहे आणि येत्या महारविवारमध्ये लतिकाला अभिची साथ मिळणार आहे. काय असेल हा महारविवार एपिसोड हे येत्या 10 जानेवारी रोजी पाहायला मिळेल. ही लतिका आणि अभिमन्यूच्या नात्याची नवी सुरुवात असेल की काय याचही उत्तर या खास भागात पाहायला मिळणार आहे.

नुकतेच या मालिकेने 100 भागही पूर्ण केले आहेत. या पार्श्वभूमिवर आता या मालिकेचा खास एपिसोडही पाहायला मिळतोय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive