By  
on  

सुबोध भावेची नवी मालिका, ‘तुला पाहता रे’मधून करतोय छोट्या पडद्यावर पुनरागमन

अभिनेता सुबोध भावे सिनेसृष्टील एक गुणी अभिनेता. त्याने आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. अभिनयासोबतच सुबोध दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्रातसुध्दा उल्लेखनीय कामगिरी करतो आहे. पण सिनेमांच्या व्यस्त शेड्यूलमुळे सुबोध बरेच दिवस छोट्या पडद्यापासून दूर होता.‘का रे दुरावा’ ही त्याची शेवटची मालिका होती. यात अविनाश देव ही व्यक्तिरेखा त्याने साकारली होती. पण आता जवळपास दोन वर्षानंतर तो टीव्हीवर पुनरागमन करतोय.

झी मराठीसोबतच तो ‘तुला पाहता रे’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतोय. या नव्या मालिकेद्वारे झी मराठी एक आगळा विषय हाताळत आहे. हा विषय नात्याला वयाची कुठलीही मर्यादा नसते या आगळ्या विषयावर आधारित आहे. ईशा आणि विक्रमच्या नात्याची ही गोष्ट आहे. मालिकेच्या प्रोमो पाहून मालिकेविषयी बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेविषयची अधिक माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. गेल्या काही वर्षात सुबोध भावे यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाने सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘बालगंधर्व’,‘लोकमान्य एक युगपुरुष’ तसंच ‘कट्यार काळजात घुसली’ या लोकप्रिय सिनेमासाठी दिग्दर्शन आणि अभिनय अशी दुहेरी भूमिका साकारली आहे. आता ‘तुला पाहता रे’ सिनेमात ‘विक्रम सरंजामे’ या भूमिकेत सुबोधच्या अभिनयाचे कोणते पैलू पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive