By  
on  

बिग बॉस मराठी, अखेर सईने पत्रकारांसमोर दिली पुष्करसोबतच्या प्रेमाची कबुली

मराठी टेलिव्हिजन जगतात प्रथमच प्रसारित होणा-या मराठी बिग बॉसचे पहिले पर्व चांगलंच गाजतंय. प्रेक्षकांनासुध्दा या रिएलिटी शोमधील विविध रुचकर किस्से फारच आवडत आहेत आणि ते हा शो छान एन्जॉयसुध्दा करत आहेत. घरातील दोन स्पर्धक सई आणि पुष्करची हळूवार लव्हस्टोरी आपण सर्वांनीच पाहिलीय. त्यांची सुरु असलेली गुफ्तगू सर्वांनाच माहितेय. पण दोघं फक्त फ्लर्ट करतायत की त्यापुढे त्यांच्यात काही शिजतंय याचा आपल्याला काही अंदाज लागत नाही. सई अनेकदा म्हणते माझी बस सुटलेली आहे.

बिग बॉसने घरात नुकतेच पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांनी सई-पुष्करला त्यांच्या हेल्दी फ्लर्टींगवरुन चांगलंच धारेवर धरलं. जर पुष्करचं लग्न झालं नसतं तर सई तु काय विचार केला असता, तेव्हा सई म्हणाली “मी पुष्करसोबत लग्न केलं असतं. मी बस नक्कीच पकडली असती. या घरातला तो खुप हॅण्डसम मुलगा आहे. आणि मला त्याच्यासोबत वेळ घालवायला खुप आवडतं. आम्ही एकमेकांसोबत सर्व शेअर करतो. पुष्करला देखील हाच प्रश्न विचारण्यात आला होता.  त्यावर पुष्कर सांगतो, माझे लग्न झाले असून मला एक गोड मुलगी आहे. मी माझ्या संसारात खूपच खूष आहे. पण माझे लग्न झाले नसते तर मी नक्कीच सईचा विचार केला असता.

रेशम बेघर झाल्यानंतर सई लोकूर, पुष्कर जोग, आस्ताद काळे, मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत आणि स्मिता गोंदकर या सहा स्पर्धकांनी फायनलला थेट धडक मारलीय. आता ग्रॅंड फिनालेसाठी चारच दिवस उरले असून पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive