झी मराठीवर सुरू असलेली 'ग्रहण' ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेतील गूढ आता लवकरच उलगडणार आहे. या मालिकेच्या जागी आता एक नवीन मालिका 'बाजी' प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'बाजी' मालिकेत पेशवाईच्या काळातील पार्श्वभूमी पाहायला मिळणार आहे.
'बाजी'ची कथा ऐतिहासिक कथेवर आधारित असली तरी ही मालिका पूर्णपणे काल्पनिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पेशवाई नामशेष करण्यासाठी ऐका हेराला पेशवाईत पाठवण्यात आले होते आणि पेशवाई संपविण्यासाठी त्याला 100 दिवसांची मुदत देण्यात आली होती, हे मालिकेचे मूळ कथानक आहे. मालिका जरी काल्पनिक असली तरी त्यात फक्त वास्तविक घटनांचा संदर्भ घेण्यात आला आहे. मराठ्यांचा इतिहास फार मोठा आहे.
https://www.facebook.com/zeemarathiofficial/videos/10157512340599307/
“प्रेक्षकांना नेहमी वेगळ्या विषयावरच्या व मर्यादित भागांच्या मालिका आवडतात, सासू-सुनांच्या मालिकेपेक्षा ते अशा ऐतिहासिक मालिकांना जास्त पसंती देतात या हेतूनेच आम्ही प्रेक्षकांना काहितरी नवीन देण्यासाठी 'बाजी' ही मालिका घेऊन आलो आहोत,” असे झी मराठीचे बिझिनेस हेड निलेश मयेकर म्हणाले.
'बाजी'चे दिग्दर्शन आणि निर्मिती संतोष कोल्हे यांनी केली आहे. स्पेशल इफेक्टस्चा भरपूर वापर करुन मालिकेला आणखी खुलवण्यात आले आहे. सासवड, भोरचा वाडा अशा विविध ऐतिहासिक ठिकाणी मालिकेचे शूटींग पूर्ण करण्यात आले आहे.
येत्या 30 जुलैपासून सोमवार ते शुक्रवार रात्री रात्री 10.30 वा. 'बाजी' मालिका झी मराठीवर प्रसारित होणार आहे.