By  
on  

कलर्स मराठीवर छोट्या सूरवीरांचे मोठे स्वप्न होणार साकार - 'सूर नवा ध्यास नवा'

संगीत प्रतिभेला प्रोत्साहन देणा-या सूर नवा ध्यास नवा हा कलर्स मराठी वाहिनीवरील रिएलिटी कार्यक्रमाचं पहिलं पर्व खुपच लोकप्रिय ठरलं. आता या कार्यक्रमाचे छोटे सूरवीर हे नवे पर्व वाहिनीवर लवकरच दाखल होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला छोट्या गायकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. उत्साहाने मुलं या ऑडिशन्समध्ये सहभागी होत आहेत.

कार्यक्रमाच्या ऑडिशन्स मध्ये मुंबई, औरंगाबाद, पुणे, ठाणे, येथील केंद्रांवर छोट्या स्पर्धकांनी अप्रतिम गाणी सादर केली. अवधूत दादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे हे सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे अद्याप उलगडलेले नाही.

ऑडिशन्सला आलेल्या अनेक स्पर्धकांनी त्यांच्या उत्तम सादरीकरणामुळे परिक्षकांची मने जिंकली परंतु या निवड चाचणीमधून निवड झालेल्याच काही स्पर्धकांना मुंबईला येऊन मेगा ऑडिशन्स मध्ये त्यांचे गाणे सादर करायला मिळाले. सूर नवा ध्यास नवाचे मागील पर्व हे प्रेक्षकांना फार आवडले आणि त्यांनी उदंड प्रतिसाद दिला. हे पर्व छोटे सुरवीर आपल्या गायनाने जिंकून घेतील हे सांगायला नको. त्यांच्या सुरेल मैफलीची संपूर्ण महाराष्ट्राला आतुरता आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive