By  
on  

‘सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर’ चे सूत्रसंचालन तेजश्री प्रधान नाही, ही अभिनेत्री करतेय

संगीत प्रतिभेला प्रोत्साहन देणा-या सूर नवा ध्यास नवा हा कलर्स मराठी वाहिनीवरील रिएलिटी कार्यक्रमाचं पहिलं पर्व खुपच लोकप्रिय ठरलं. आता या कार्यक्रमाचे छोटे सूरवीर हे नवे पर्व वाहिनीवर लवकरच दाखल होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला छोट्या गायकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. उत्साहाने मुलं या ऑडिशन्समध्ये सहभागी होत आहेत.

अवधूत दादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे हे सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत.पण ‘सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा कोण सांभाळणार यासाठी ब-याच चर्चा रंगल्या. तेजश्री प्रधान हिने पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन केले होते, आता कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण हे कोडे आता उलगडले आहे. सिनेमा, मालिका, नाटक आणि लेखन अशी चतुरस्त्र भूमिका साकारणारी अभिनेत्री स्पृहा जोशी करणार आहे.

बच्चे कंपनी आणि परिक्षक यांच्यात संवांद साधणारे सूत्रसंचालक यांच्यावर कार्यक्रमाची मोठी जबाबदारी असते. ही जबाबदारी स्पृहा लिलया पेलेल याची खात्री वाटते. https://marathi.peepingmoon.com/ तर्फे स्पृहा जोशीला या नवीन जबाबदारीनिमित्त खुप खुप शुभेच्छा!

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive