By  
on  

पाहा ‘कसौटी जिंदगी 2’ची कोमोलिका हिना खानचा फर्स्ट लूक

एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सने ‘कसौटी जिंदगी 2’ मालिकेची घोषणा केली आणि चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रेक्षक ही मालिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच वृत्त होते की प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री हिना खान कोमोलिकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. हिनाला फार मह्त्त्वकांक्षी आणि चॅलेंजींग भूमिका ऑफर झाल्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

‘कसौटी जिंदगी 2’च्या सेटवरुन नुकताच हिना खानचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या लूकमध्ये ती एकदम पारंपारिक बंगाली स्त्रीच्या भूमिकेत पाहायला मिळतेय. कपाळावर ठळक लाल टिकली, कानात मोठ-मोठे इअररिंग्स, डार्क लिपस्टीक आणि मोकळे केस अशा सुंदर अवतारात ही बंगाली बाला हिना खान पाहायला मिळतेय.

टीव्ही क्वीन एकता कपूरने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर ‘कसौटी जिंदगी 2’चा एक प्रोमो सर्वांसोबत शेअर केला आहे. यात मालिकेतील अनुराग-प्रेरणा या प्रमुख व्यक्तिरेखांसोबतच मालिकेतील इतर कलाकारांचासुध्दा उलगडा झाला आहे.

https://www.instagram.com/p/BoGQjtyAYXY/?taken-by=ektaravikapoor

‘कसौटी जिंदगी 2’ या मालिकेतून अनुराग आणि प्रेरणाच्या भूमिकेतून पार्थ समथान व एरिका फर्नांडिझ  ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. येत्या  25 सप्टेंबरपासून रात्री हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive