By  
on  

‘झी मराठी अ‍ॅवॉर्ड्स २०१८’ पुरस्कारांमध्ये ‘तुला पाहते रे’ मालिकेची बाजी

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठी प्रेक्षकांसाठी नेहमीच नाविन्यपूर्ण मालिका आणि कार्यक्रमांचा नजराणा घेऊन येते. दिवाळी आता उंबरठ्यावर येऊन ठेपलीय, पण त्यापूर्वीच आपल्या झी मराठीवरील लाडक्या कलाकारांनी उत्सव नात्यांचा साजरा केला आहे. ‘झी मराठी अ‍ॅवॉर्ड्स २०१८’ ची घोषणा झाली व कोणत्या मालिका आणि कोण कोणतो कलाकार सर्वोत्कृष्ट पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवणार याकडे सर्वांचे लक्ष होते. ‘झी मराठी अ‍ॅवॉर्ड्स २०१८’ पुरस्कारांमध्ये अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी ‘तुला पाहते रे’ मालिकेने नऊ पुरस्कार पटकावत बाजी मारली. त्यापाठोपाठ ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेनेही पाच पुरस्कारांवर आपला ठसा उमटवला. तसेच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला एक विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे झी मराटीवरील प्रमुख कलाकार आणि मालिकांमधील पात्रांचे विशेष परफॉर्मन्स पाहणं हे या शानदार सोहळ्याचं मुख्य आकर्षण ाहे.

ऑफिसमधील कामं सोडून झेंडे आणि मायरासुद्धा नाचणार झी मराठी अवॉर्ड 2018 मध्ये. #ZMA2018 pic.twitter.com/TXygbATv7j

या रंगतदार सोहळ्याचा आनंद येत्या रविवारी, २८ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता ‘झी मराठी’ आणि ‘झी मराठी एचडी’ वाहिनीवर घेता येणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive