By  
on  

पाहा Video : 'मन उडु उडु झालं' मालिकेतील कलाकारांची हॉट एअर बलूनमध्ये सैर

नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मन उडू उडू झालं ही मालिका अल्पावधीत त्यांची आवडती बनली असून त्यातील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. या मालिकेतील इंद्रा आणि दिपू म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी मालिकेच्या नावाप्रमाणे उंच भरारी घेतली आहे. मालिकेतील या कलाकारांनी हॉट-एअर बलूनची सैर केली आणि आकाशाला गवसणी घातली.

 

मालिकेच्या प्रमोशनसाठी ही कलाकार मंडली थेट हटॉ-एअर बलूनमधून सफर करताना दिसली. यासाठी दोन्हीही कलाकार अतिशय उत्सुक होते आणि त्यांनी या ऍक्टिव्हिटीचा मनसोक्त आनंद लुटला.  या हॉट-एअर बलूनमध्ये मालिकेचे काही सिन देखील चित्रित करण्यात आले आहेत जे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळतील.


याबद्दल बोलताना हृता म्हणाली की, "मला अजूनही विश्वास बसत नाही आहे कि आम्ही अशी ऍक्टिव्हिटी केली हे माझ्या कल्पेने पलीकडचं होतं. मन उडू उडू झालं म्हणत आम्ही खरोखरच उडतोय." तर या अनोख्या अनुभवाबद्दल बोलताना अजिंक्य म्हणाला की, "मन उडू उडू झालं या मालिकेला प्रेक्षक खूप उदंड प्रतिसाद देत आहेत याचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे. उडू उडू या शब्दाशी संदर्भ लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या मालिकेमुळे आम्हाला अनुभवायला मिळत आहेत आणि ही ऍक्टिव्हिटी देखील त्याचाच एक भाग आहे. प्रेक्षकांनी आमच्यावर असंच प्रेम करत राहावं आणि त्यांच्या अफाट प्रेमाने आमची मालिकादेखील लोकप्रियतेची गगनभरारी घेतेय असं म्हणेन."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive