By  
on  

पाहा Photos : नंदीता वहिनी फेम धनश्री काडगावकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर, साकारतेय ही भूमिका..

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अनेक कलाकार लोकप्रिय ठरले. त्यातील एक म्हणजे अभिनेत्री धनश्री कडगावकर. नंदीता वहिनीच्या भूमिकेतून धनश्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र प्रेग्नसीनंतर धनश्रीने तिंच काम थांबवलं होतं. मात्र मोठ्या कालावधीनंतर धनश्री पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालीय. 

तुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात 'घेतला वसा टाकू नको' या कार्यक्रातून पाहायला मिळतात. या कार्यक्रमात नवरात्री विशेष भागात धनश्री काडगावकर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धनश्रीने या आधी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत पण आता ती एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या मालिकेत धनश्री दुर्गा मातेच्या भूमिकेत दिसेल.


या भूमिकेविषयी बोलताना धनश्री म्हणते की, "माझ्या मुलाच्या जन्मानंतर खऱ्या आयुष्यात आईची भूमिका निभावताना माझा अभिनयापासून संपर्क तुटला. मध्ये मोठा गॅप आल्यामुळे मला पुन्हा काम करता येईल की नाही, मी काही विसरली तर नाही ना अशा अनेक शंका माझ्या मनात येत होत्या. पण मला माझ्या कुटुंबाकडून आणि या मालिकेच्या नावातूनच खूप प्रोत्साहन मिळालं. घेतला वसा टाकू नको असं मी माझ्या मनाशी पक्क करून हि भूमिका स्वीकारली. या मालिकेमुळे दुर्गामातेची भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा मातेची अलौकिक भूमिका माझ्या वाट्याला आली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive