लोकप्रिय नायिकांच्या मांदियाळीत रंगणार सारेगमप लिटिल चॅम्प्सचा नवरात्री विशेष भाग

By  
on  

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या मंचावर छोट्या स्पर्धकांची सुरेल गाणी तर ऐकायल मिळतातच. मात्र विशेष भागांमध्ये पाहुणे मंडळींची देखील हजेरी पाहायला मिळते. असाच नवरात्री विशेष भाग यावेळी पाहायला मिळणार आहे.

 या आठवड्यात नवरात्रीचा उत्साह कायम ठेवत सर्व स्पर्धक देवीला समर्पित करणारी गाणी सादर करणार आहेत आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी मंचावर सज्ज होणार आहेत झी मराठीच्या लाडक्या मालिकांमधील प्रमुख नायिका.


प्रार्थना बेहेरे, अन्विता फलटणकर, ऋता दुर्गुळे, श्वेता राजन, कुंजिका काळविण्ट, तन्वी कुलकर्णी, वैष्णवी करमरकर या प्रेक्षकांच्या आवडत्या नायिकांसोबतच महाराष्ट्राची महानायिका अलका कुबल आणि प्रेरणादायी बीजमता राहीबाई पोपेरे देखील या विशेष भागात सहभागी होणार आहेत.

या सर्व नायिकांच्या उपस्थितीत  लिटिल चॅम्प्स खूप धमाल करणार आहेत. त्यांच्या गाण्यांमुळे या नायिकांनी मंचावर ताल देखील धरला आणि काही गाणी ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. लवकरच हा खास भाग सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये पाहायला मिळेल.

Recommended

Loading...
Share