पाहा Photos : मराठी पुरस्कार सोहळ्याला कतरीनाची हजेरी, तर गोविंदा यांनी केला धमाल डान्स

By  
on  

 नुकताच झी मराठी अवॉर्ड 2021 चा सोहळा पार पडला. यावेळी मराठी कलाकारांसह बॉलीवुडमधील दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी बॉलीवुड ब्युटी कतरीना कैफची हजेरी पाहायला मिळाली. सुंदर पेहरावात कतरीना आणि रोहीत शेट्टी यांनी या मराठमोळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

यासह दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि गोविंदा यांच्या हजेरीनेही सगळ्यांचं लक्ष वेधलं. गोविंदा यांनी मंचावर त्यांच्या डान्सची जादू दाखवली. 

शिवाय प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकांचे कलाकार देखील यावेळी या पुरस्कार सोहळ्यासाठी खास अंदाजात दिसले.

प्रत्येक मालिकेचा एक कलर कोड ठरवण्यात आला होता. ज्यात मन झालं बाजींद - पिवळा, मन उडु उडु झालं - लाल, येऊ कशी तशी मी नांदायला - निळा, माझी तुझी रेशीमगाठ - जांभळा, तुझ्या माझ्या संसाराला काय हवं - भगवा, ती परत आलीये - काळा, रात्रीस खेळ चाले 3 - पांढरा. या रंगात रेड कार्पेटवर कलाकारांनी दिमाखदार पोषाखात हजेरी लावली. मालिकांमध्ये यंदा 'मन झालं बाजींद', 'मन उडु उडु झालं', 'येऊ कशी तशी मी नांदायला', 'माझी तुझी रेशीमगाठ', 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!', 'ती परत आलीय', 'रात्रीस खेळ चाले 3' या मालिकांमध्ये तीव्र चुरस बघायला मिळाली. 

Recommended

Loading...
Share