By  
on  

नवी 'शेवंता' साकारणाऱ्या या अभिनेत्रीविषयी या गोष्टी माहिती आहेत का ?

रात्रीस खेळ चाले 3 या मालिकेत आता शेवंता या लोकप्रिय व्यक्तिरेखेच्या जागी एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मालिकेत सध्या अभिनेत्री कृतिका तुळसकर ही शेवंताची भूमिका साकारणार आहे. याआधी शेवंता हे पात्र अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर साकारत होती. मात्र आता हे पात्र आता कृतिका साकारतेय.  बॉडीशेमिंग आणि पेयमेंटच्या टाळाटाळमुळे अपूर्वाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतलाय. आणि आता अपूर्वाच्या जागी कृतिका शेवंताचं पात्र साकारतेय.


कृतिका ही गेली 18 वर्षे थिएटर माध्यमात कार्यरत असून तिने अनेक नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलय. कृतिका एक नृत्यांगना असून ती कथ्थक विशारद आहे. सायकॉलॉजिस्ट असलेली कृतिका आपली आवड जोपासण्यासाठी अभिनय क्षेत्राकडे वळली होती.
शेवंताची भूमिका साकारणे हा तिच्या अभिनय क्षेत्रामधील कारकिर्दीतला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट असून त्याविषयी बोलताना कृतिका म्हणते की, "रात्रीस खेळ चाले ही मालिका आणि त्यातील पात्र ही खूप लोकप्रिय असून प्रेक्षक त्यावर खूप प्रेम करतात. शेवंता ही भूमिका माझ्या वाट्याला आली असली तरी त्या भूमिकेच्या लोकप्रियतेकडे पाहता ही भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. मी अशा करते कि प्रेक्षकांना माझं काम आवडेल आणि ते मला शेवंता म्हणून स्वीकारतील."

सध्या मालिकेत अजून एका नवीन व्यक्तिरेखेच्या एन्ट्रीमुळे मालिका रंजक वळणावर आली आहे. वच्छी हे पात्र पुन्हा एकदा मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत असून ती एका नवीन लुकमध्ये दिसतेय. त्यामुळे या मालिकेत पुढे काय पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive