By  
on  

''सुंदरा मनामध्ये भरली" या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणा-या अभिनेत्रीने घेतला निरोप

सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत. अभिमन्यू आणि लतिकाच्या लव्हस्टोरीमध्ये नेहमीच मीठाचा खडा टाकणारी मिस नाशिक उर्फ कामिनीमुळे सुंदरा मनामध्यै भरली ही मालिका खुप रंगतदार झाली होती.पण आता या मालिकेत कामिनी हे नकारात्मक पात्र साकारणारी अभिनेत्री पूजा पुरंदरे हिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात तिने चाहत्यांचे आभार मानत एक सोशल मिडीया पोस्ट नुकतीच केली आहे. 

पूजा मालिकेतील सेटवरचे आणि सहकलाकारांसोबतचे खास क्षण शेयर करत लिहते, "सुंदरा मनामध्ये भरली" या मालिकेतून मी निरोप घेतला आहे.
"कामिनी " उर्फ "मिस.नाशिक" हे पात्र साकारताना खूप मजा आली. तुम्हा सर्वांकडून या पत्राला खूप प्रेम मिळालं. सुंदरा च्या सगळ्या टीम बरोबर हा प्रवास मस्त झाला. चॅनल, निर्मिती संस्था, लेखिका, दिग्दर्शक, सहकलाकार, टेक्निकल टीम अणि प्रेक्षक... सर्वांचे मनापासून आभार

पुन्हा लवकरच भेटू..

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive