By  
on  

पाहा Photos : चक्क चाहत्यांच्या लग्नात पोहोचले ओम आणि स्वीटू

प्रेक्षकांचं सुरुवातीपासून लक्ष वेधून घेणारी मालिका येऊ कशी तशी मी नांदायला सध्या वेगळ्या वळणावर पाहायला मिळतेय. लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या या मालिकेतील ओम आणि स्वीटूची जोडी प्रेक्षकांची आवडती बनलीय. या मालिकेत नुकतच ओम आणि स्वीटूचा विवाहसोहळा संपन्न झालाय. चाहत्यांनादेखील याचा प्रचंड आनंद आहे. अखेर ओम आणि स्वीटू एकत्र आल्याने चाहते आनंदी आहेत. हाच आनंद ओम आणि स्वीटूने मात्र हटके पद्धतिने साजरा केलाय.

ओम आणि स्वीटू यांनी 19 डिसेंबर रोजी ज्या जोडप्यांची लग्न होती त्यांना त्यांची विवाह पत्रिका सोशल मीडियावर पाठवायचं आवाहन केलं. आणि त्यातीलच एका जोडीच्या लग्नात उपस्थिती दर्शवण्याचं प्रॉमिस केलं. म्हणूनच प्रेक्षक-चाहते सौरभ आणि जुही यांच्या लग्नात ओम आणि स्वीटू यांनी हजेरी लावली. या नवदाम्पत्याला त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांना आपल्या लग्नात पाहून या जोडप्याला मात्र सुखद धक्काच बसला आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

चाहते आणि कलाकार यांच्यातील नातं अजून घट्ट करण्याचा ओम आणि स्वीटू यांचा हा प्रयत्न उल्लेखनीय होता. ओम आणि स्वीटूची भूमिका साकारणारे शाल्वा किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर यांनी दिलेल्या या सरप्राईजची सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive