'जीव माझा गुंतला' मालिकेत अंतराला मिळणार मल्हारची साथ ?

By  
on  

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेl एकीकडे पराकोटीचा द्वेष आणि दुसरीकडे लग्नासारखे पवित्र बंधन यामध्ये दोघांचीही म्हणजेच अंतरा आणि मल्हारची कसोटी लागत आहे. अंतराने अनेक कठीण प्रसंगांना मोठ्या धिराने तोंड दिले. चित्राकाकी आणि श्वेताच्या जाळ्यात अडकणार की काय असे वाटत असतानाच अंतराने स्वत:ची सुटका करून घेतली. कधी सुहासिनी मदतीला आली तर कधी आजी. या दोघींची साथ खानविलकर कुटुंबात अंतराला कायमच मिळाली.

आता मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. ज्यामध्ये चित्राकाकीने अंतराला अडकवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. कारण मालिकेमध्ये मोठी घटना घडली. चित्राकाकी आणि काकाला घरामधुन बाहेर काढले आणि यासगळ्यामागे अंतराचाच हात आहे असा चित्राकाकीचा समज झाला. आता अंतरालादेखील घराबाहेर कसे काढता येईल ? तिच्यासोबत सगळ्या खानविलकरांना तुरुंगात कसे टाकायचे आणि सगळ्याचा ताबा कसा मिळवायचा याचा कट चित्राकाकी आणि काका रचताना दिसणार आहेत.

चित्राकाकी अंतराला ड्रग्सच्या केसमध्ये अडकवण्याचा प्लॅन करताना दिसणार आहे. दुसरीकडे, मल्हारला काका आणि काकीच्या प्लॅनबद्दल कोणीतरी  माहिती देताना दिसणार आहेत. आता या सगळ्यामधून अंतरा कशी वाचणार ? मल्हारची साथ अंतराला मिळणार का ? अंतरावर मल्हार विश्वास ठेवणार का ? हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.  आता मल्हार अंतराला यातून सुखरूप सोडवू शकेल ? की चित्राकाकीने रचलेल्या या सापळ्यात अंतरा अडकेल हे बघणे रंजक ठरणार आहे.  

 

Recommended

Loading...
Share