By  
on  

सुहानीला शोधण्यात मिनाक्षी होणार यशस्वी, अखेर होणार आई - मुलीची भेट

सध्या मराठी टेलिव्हिजनवर आई - मुलांच्या नात्यावर आधारित अनेक मालिका पाहायला मिळत आहेत. यातच 'आई मायेचं कवच' या मालिकेनेही सुरुवातीपासून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री भार्गवी चिरमुलेला पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर नव्या भूमिकेत पाहायला मिळतय. याशिवाय भार्गवी साकारत असलेल्या मिनाक्षीचे विविध गेटअप लुक्स लक्षवेधी ठरले आहेत. 

यातच या मालिकेत आता मिनाक्षीला तिच्या कार्यात यश येणार आहे. आपल्या मुलीच्या शोधात असलेली मिनाक्षी ही मुलीचा शोध घेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जाताना दिसली. यात तिला अनेकांनी मदत केली तर अनेक शत्रूही आड आले.

या सगळ्यात मिनाक्षीला तिची मुलगी सुहानीला शोधण्यात यश आलय. मिनाक्षी आणि सुहानी या आई- मुलीची भेट होताना पाहायला मिळणार आहे. तेव्हा हा भाग पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मात्र आई - मुलीच्या या भेटीनंतर या मालिकेत पुढे काय होईल हो पाहणं महत्त्वाचं ठरेल. अनेक सस्पेन्स आणि थ्रिरलने भरलेली ही मालिका एकामागोमाग एक ट्विस्ट घेऊन येत असल्याने या मालिकेच्या आगामी भागात काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना असेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive