या अभिनेत्रीच्या एन्ट्रीने 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत नवा ट्विस्ट

By  
on  

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. एकीकडे किर्ती आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस अधीकारी बनण्याची ट्रेनिंग घेत आहे. तर दुसरीकडे जामखेडकर कुटुंबात नवं वादळ आलय. 

किर्तीसोबत लग्न करण्याआधी शुभमचं लग्न कविताशी ठरलेलं असतं. मात्र कविता ही लग्नाच्या मंडपातूनच पळून जाते. त्यामुळे शुभम आणि कविताचं लग्न मोडतं. त्यानंतर शुभमचं लग्न हे किर्तीसोबत होतं. किर्ती आणि शुभमचा सुखाचा संसार सुरु असतानाचा आता पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात कविताची एन्ट्री झालीय. कविताने नुकतीच शुभमच्या बहिणीची मदत केलय. मात्र ती मदत करणारी कविता असल्याचं कळताचं जीजी अक्कांचा राग अनावर होतो. असं असताना कविता पुन्हा त्यांच्या आयुष्यात आल्याचं पाहायला मिळतय. 

या कविताची भूमिका साकारणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे. भाग्यश्रीची नुकतीच या मालिकेत खास एन्ट्री झाली आहे. तेव्हा कविताची ही भूमिका मालिकेत नवा ट्विस्ट घेऊन आल्याचं पाहायला मिळतय. मात्र किर्तीला कविताविषयी कळाल्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share