By  
on  

अनिरुध्द घटस्फोट देणार म्हणून संजना बिथरली

स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते?’मध्ये दररोज काही ना काही नवे घडत आहे. छोटया पडद्यावरची ही सर्वात लोकप्रिय ंमालिका. गेल्या अमेक दिवसांपासून या मालिकेत बरेच वाद-विवाद सुरु आहेत. संजनाने संपूर्ण घर हे अनिरुध्दच्या आईला फसवून स्वताच्या नावे केल्याने त्याच्या मनातून ती साफ उतरलीय. तर इथे अरुंधती सासूबाई काहीही बोलल्या कसंही वागल्या तरी त्यांच्या काळजीपोटी देशमुखांच्या घरात येऊन त्यांची आजारपणात काळजी घेतेय हे अनिरुध्दने अचूक हेरलंय. 

सध्या सोशल मीडियावर मालिकेच्या आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कांचन आईचा  वाढदिवस मुला-नातवंडांनी एकत्र येऊन साजरा केला. सर्वांनी खुपच धम्माल केली. आई-अप्पासुध्दा आता अरुंधतीमुळेच एकत्र आले आहेत. या सगळ्यात आता अनिरुध्द आणि संजनामध्ये मात्र खटके उडतायत त्यांचं पटेनासं झालंय. संजनाने सर्वांना फसवून समृध्दी बंगला तिच्या नावावर केल्याने देशमुख कुटुंब संतापलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

संजनाचा हा कारनामा समोर येताच अनिरुद्ध देखील संतापला आहे. त्याने रागाच्या भरात, घर परत कर, नाहीतर तुला घटस्फोट देईन, अशी धमकी संजनाला दिली. संजनाने घरातील लोकांची फसवणूक केल्याचे कळताच अरुंधतीने देखील तिला चांगलेच बोल लगावले आहेत. ‘तुझ्या याच वागण्यामुळे अनिरुद्ध तुझ्यापासून दूर जात आहेत. घरातील लोक देखील तुझा तिरस्कार करत आहे. तुझ्याविरोधात पोलीस तक्रार केल्यास कुणालाही काहीही फरक पडणार नाही. तुला कुणी वाचवायलाही येणार नाही’, असं अरुंधती संजनाला म्हणते.

एकीकडे अनिरुध्दची घटस्फोटाची धमकी तर दुसरीकडे देशमुख कुटुंबियांनी पोलिसांत जाण्याची दिलेली धमकी या कचाट्यात आता संजना सापडली आहे. त्यामुळे अनिरुध्द आपल्याला दुरावेल की काय या भीतीपोटी संपूर्ण देशमुख कुटुंबासमोर त्यांच्या घराचे पेपर्स त्यांना परत करते. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive