या वाहिनीवर पाहायला मिळणार मनोरंजनाचा अधिक मास

By  
on  

प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनासाठी झी मराठी वाहिनी कायम वेगवेगळे कार्यक्रम घेऊन येत असते. झी मराठीवरील मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांना आपल्यातील एक वाटतात आणि म्हणूनच या मालिकांना प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान मिळतं. संध्याकाळ झाली कि होम मिनिस्टर ते थेट रात्री देवमाणूस बघितल्यावरच प्रेक्षकांच्या दिवसाची सांगता होते.

आता या वाहिनीच्या रसिक प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. मे महिन्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा अधिक मास असणार आहे. आता सोमवार ते शनिवारच नाही तर रविवारी सुद्धा प्रेक्षक आपल्या आवडत्या मालिका पाहू शकतील.

त्यामुळे आता रविवारीसुद्धा 'होम मिनिस्टर', 'मन झालं बाजींद', 'मन उडू उडू झालं', 'तू तेव्हा तशी', 'माझी तुझी रेशीमगाठ' आणि 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या  आवडत्या मालिका नेहमीच्या वेळेवर पाहायला मिळणार आहेत कारण आता मनोरंजनाला आता सुट्टी नाहीय.

Recommended

Loading...
Share