By  
on  

'कोण होणार करोडपती'चा नवा सिझन लवकरच, विजेत्याला 2 करोड रुपये जिंकण्याची संधी!

ज्ञान आणि बुद्धी यांच्या जोरावर करोडपती होण्याची अनोखी संधी देणार्‍या 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सिझनचं वैशिष्ट्य म्हणजे विजेत्याला २ करोड रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. 
 

करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येक जण पाहतो, पण सर्वसामान्यांचं हे स्वप्न सत्यात उतरण्याची संधी सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा घेऊन येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती'च्या आधीच्या सगळ्या सिझन्सला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मनोरंजनासोबत ज्ञानार्जन हे वैशिष्ट्य असणार्‍या या कार्यक्रमात ज्ञान तुम्हांला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकतं याची प्रचिती मागील सिझन्समुळे  सगळ्यांना आली आहे. यंदाही 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत.  

 

 

अभिनय कौशल्याबरोबरच सचिन खेडेकर सहभागी स्पर्धकांशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचं काम मोठ्या खुबीनी करतात. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात सहभागी होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. दरवर्षीप्रमाणे मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक सहभागी होण्यासाठी नोंदणी करून घेऊ शकतात. यंदाच्या सिझनमध्ये काय वेगळेपण असेल, स्पर्धक कसे असतील, २ करोड रुपये कोणी जिंकू शकेल का; हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive